नगरसेवक वसंत मोरे यांनी महापालिकेच्या इमारतीत बेड टाकून केले निषेध आंदोलन
पुणे - कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी बेड मिळत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकानी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून निषेध आंदोलन केले.
पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाकडून हव्या तशा सुविधा निर्माण रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून आंदोलन केले.
पुणे महापालिकेने आतापर्यंत कोरोनासाठी 200 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. मग 200 कोटी रुपये खर्च झाले असताना अजूनही सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर काम करत आहेत त्यांना रुग्णालयात बेड का उपलब्ध होत नाहीत. पुणे महापालिकेने ज्या रूग्णालया सोबत करार केला आहे ती रुग्णालय अक्षरशः लॉजिंग अँड बोर्डिंग झाली असल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागं व्हावं आणि महापालिकेसोबत करार असलेल्या खाजगी रुग्णालयात खऱ्या रुग्णाला कसे बेड मिळतील यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
#SakalMedia #SakalVideo #MNS #VasantMore #Punevideo #Pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.